Tarun Bharat

Kolhapur : क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून पुलाची शिरोलीमध्ये प्रतिज्ञा पञांची चौकशी

पुलाची शिरोली / वार्ताहर

मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून रविवारी सायंकाळी पुलाची शिरोलीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिलेल्या पाठींबा प्रतिज्ञा पञांची चौकशी करण्यात आली.

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे. हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांच्या गटाकडून पाठींबा प्रतिज्ञा पञे गोळा करण्यासाठी संपूर्ण राज्यात जणू स्पर्धाच सुरू झाली होती. यामध्ये बोगस प्रतिज्ञापञे दाखल करण्यात आली आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली होती.

त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून चौकशी केली जात आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता हे पथक पुलाची शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. त्यांनी प्रतिज्ञा पञावरील नावानुसार शिवसैनिकांना बोलावून खाञी करुन घेतली. यामध्ये नाव, ओळखपत्र, सही आदींचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्याकडून सहमती असल्याचे जबाब नोंदवून सह्या करून घेण्यात आल्या. यावेळी मुंबई क्राईम ब्रॅंचचे पोलिस पथक गावात आल्यामुळे ग्रामस्थांच्यातून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख सातापा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, शहर प्रमुख राजकुमार पाटील यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता

Archana Banage

दारी मुहुर्तमेढ..अन् कोरोनानं दोघांना गाठलं..!

Archana Banage

कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून कबनुरात तरुणाचा खून

Archana Banage

राज्य विद्युत महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Archana Banage

कोरोना परिस्थितीत पत्रकारिता करणाऱ्यांचा सन्मान करा : अरुणीमा माने

Archana Banage