Tarun Bharat

लाच प्रकरणातील कॉल रेकॉर्डचा तपास सुरु

तक्रारदार अमित शिंदे यांनी ध्वनीफित व कागदपत्रे केली सादर

प्रतिनिधी/ सातारा

पालिकेच्या आरोग्य विभागात घंटागाडीच्या ठेक्याचे बिल काढण्यास टक्केवारी मागितल्याचे कॉल रेकॉर्डिंग असून ते सर्व कॉल रेकॉर्डीग व संभाषणाची कागदपत्रे तक्रारदार अमित शिंदे यांनी लाचलुचपत विभागाकडे सादर केली. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे अमित शिंदे यांनी केलेल्या अर्जानुसार पालिकेतील आरोग्य विभागातील लाच स्वीकारणाऱया त्या कर्मचाऱयांची चौकशी सुरु आहे. अमित शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार व दिलेल्या पुराव्याची चौकशी सुरु असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याचे समजते.

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात अतिशय बजबजपुरी माजलेली होती. आरोग्य विभागाचे अधिकारी उघड उघडपणे बोलून चालून घोळ करत होते. चुकीचे काम सुरु असल्याचे वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येत होते. कोरोनाच्या कार्यकाळात आरोग्य विभाग कामात असताना केलेल्या कामांच्या बिलाची अनामत रक्कम टक्केवारी घेतल्याशिवाय देता येणार नाही, असे म्हणून अमित शिंदे यांना आडकाठी केली जात होती. शिंदे यांच्याकडून अनेकदा पैसेही घेतले होते. पैसे घेताना कोणाला किती द्यायचे हा वाटा कसा असेल याचे फोनवर संबंधित अधिकाऱयांकडून अमित शिंदे यांना वारंवार बोलल्याचे कॉल रेकॉर्डमध्ये स्पष्ट उल्लेख आहे.

लाच घेण्यासाठी त्याच दिवशी प्रांत कार्यालयात कोरोनाची बैठक अर्धवट सोडून अधिकारी हे पालिकेत आले. त्यांनी त्यावेळी पालिकेच्या बाहेरच झाडाखाली 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेतले. तेव्हा चौघांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. त्यानंतर विभागीय आयुक्तांची चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांना कामावर रुजू करण्यात आले आहे. आता अमित शिंदे यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार पुन्हा चौकशी सुरु झालेली असून त्यांनी संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले गेले आहे. त्यावरुन लाचलुचपत विभाग नेमकी काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

पाटण तालुक्यात 30 जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भिती

datta jadhav

सातारा तालुक्यात गावागावात शिवसेनेची विचारधारा रुजवणार

Patil_p

जावली बँकेबाबत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

खवल्या मांजराची शिकार रोखण्यासाठी अभ्यासगट

Patil_p

सातारचा बाल लेखक अथर्वची जागतिक स्तरावर दखल

Patil_p

सासऱयाने जावयाच्या अंगावर घातली गाडी

Patil_p