पोलीस कोठडीत घेऊन केला तपास
प्रतिनिधी / बेळगाव
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चोऱया, घरफोडय़ांच्या तपासासाठी दोघा अट्टल गुन्हेगारांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली.
प्रकाश पाटील (वय 37, रा. साखळी, गोवा), महेश रामा काळगिनकोप्प (वय 37, रा. खानापूर) या दोघा जणांना न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीअंती अटकेची कारवाई करून त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
गेल्या आठवडय़ात कॅम्प व सीसीबीच्या अधिकाऱयांनी या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून दीड किलो सोने, 4 किलो चांदी, एक मोटारसायकल जप्त केली होती. त्यांनी शिंदोळी व होन्याळ येथे घरफोडय़ा केल्याची कबुली दिली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱयांनी न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीस कोठडीत घेतले.