Tarun Bharat

‘डेलिव्हरी, व्हीनस’ला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

वृत्तसंस्था/ मुंबई

 वस्तुंची डिलिव्हरी करणारी कंपनी डेलिव्हरी आणि स्टेनलेस स्टील पाइप व टय़ुब बनवणारी कंपनी व्हीनस पाइप्स अँड टय़ुब्ज यांचे आयपीओ शुक्रवारी बंद झाले. यात व्हीनसच्या 165 कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद नोंदवला व हा आयपीओ 16.31 पट सबस्क्राइब झाला. तर दुसरीकडे डेलिव्हरीच्या 5 हजार 235 कोटी रुपयांच्या आयपीओला मात्र फक्त 1.63 पट सबस्क्राइब करण्यात आले होते.

Advertisements

 आणखी तीन आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये पारादीप फॉस्फेटस्, इथोस व इमुद्रा यांचा समावेश असणार आहे. पारादीपचा आयपीओ 17 मे रोजी खुला होणार आहे. इथॉसचा आयपीओ बुधवार 18 मे रोजी खुला होणार असून इमुद्राचा आयपीओ 20 मे रोजी खुला होईल. पारादीप आयपीओतून 1501 कोटी, इथॉस 472 कोटी तर इमुद्रा 412 कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे.

व्हीनस

wव्हीनसच्या आयपीओकरीता प्राइस बँड 310 ते 326 रुपये प्रति समभाग ठेवण्यात आला आहे. 

wयाअंतर्गत गुंतवणूकदारांना किमान 14 हजार 996 रुपये गुंतवता येणार आहेत.

wशेअर्सचे अलॉटमेंट 19 मे ला होणार असून 24 मेला लिस्टिंग होऊ शकतो.

 डेलिव्हरी

wआयपीओकरीता 462 ते 487 रुपये समभाग प्राइसबँड असणार आहे. कर्मचाऱयांना प्रति समभागाकरीता 25 रुपये सवलत असणार आहे.

wशेअर्सचे अलॉटमेंट 19 मे रोजी आणि लिस्टिंग 24 मे रोजी होण्याची शक्यता.

Related Stories

‘गुगल पे’ची अन्य देशात पैसे पाठविण्याची सुविधा लवकरच

Patil_p

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये उडणार जेट एअरवेजची विमाने

Patil_p

बाजारात सेन्सेक्स 660 अंकांनी मजबूत

Patil_p

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहन उद्योगात होणार वाढ

Amit Kulkarni

इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोचे मूल्य वाढल्याने बर्कशायरचा नफा तेजीत

Omkar B
error: Content is protected !!