नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. नेतन्याहू लवकरच भारत दौऱयावर येणार आहेत. सहाव्यांदा इस्रायलच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू यांचे हार्दिक अभिनंदन करण्याबरोबरच यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान मोदींनी यासंबंधी ट्विट केले आहे. ‘माझे चांगले मित्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोलून आनंद झाला. निवडणुकीतील प्रभावी विजय आणि विक्रमी सहाव्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागिदारीतून एकत्रित पुढे जाण्याची संधी उपलब्ध होत असल्याचा आनंद वाटतो’ असे मोदींनी म्हटले आहे.