Tarun Bharat

आयओएची पहिली महिला अध्यक्ष पी. टी. उषा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची माजी महिला धावपटू पी. टी. उषाची अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवडली जाणारी पी. टी. उषा ही पहिली महिला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे शनिवारी पी. टी. उषाची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा अधिकृतपणे केली. 58 वर्षीय पी. टी. उषाने आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक कारकीर्दीत आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळविली असून 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळय़ाच्या शर्यतीतील तिचे कांस्यपदक थोडक्मयात हुकले होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. आयएओची निवडणूक यापूर्वी 2021 च्या डिसेंबरमध्ये घेतली जाणार होती. पण ती काही कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आली होती. गेल्या जुलैमध्ये पी. टी. उषाची भाजपातर्फे राज्यसभेसाठी खासदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या गेल्या 95 वर्षांच्या इतिहासामध्ये ऑलिम्पियनपटू तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूची आयओएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Stories

सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

हॅट्ट्रिक मालिकाविजयासाठी भारत सज्ज

Patil_p

रेस वॉकर केटी इरफानसह पाच ऍथलेट्स ‘पॉझिटिव्ह’

Amit Kulkarni

जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न भंगले

Patil_p

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी-20 मालिका रद्द

Patil_p

सर्बिया टेनिस स्पर्धेत रूबलेव्ह विजेता

Patil_p