वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या काही दिवसात बाजारातील नियामक सेबीकडे अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ आणण्यासंदर्भात अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आता साह पॉलिमर्स लिमिटेड यांचीही भर पडणार आहे. साह पॉलिमर्सने आयपीओ आणण्याची तयारी केली असून याअंतर्गत आवश्यक ती कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केली असल्याचे समजते.
अर्जामध्ये 1,02,00,000 नव्या इक्विटी समभागांना ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्रीसाठी सादर केले जाणार आहे. आयपीओतून उभारलेले पैसे कंपनी फ्लेक्सीबल इंटरमिडीएट बल्क कंटेनर्स प्लांटसाठी व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वापरले जाणार आहेत. यासोबत नव्या प्रकल्पांकरीता व कर्ज चुकवण्यासाठीही यातील काही रक्कम वापरली जाणार असल्याचे समजते. सदरची कंपनी मूळची उदयपूरची असून पॉलिमर्स पॉलिप्रॉपलीन, पॉलिथिलीन एफआयबीसी बॅग व पॉलिमरपासून बनलेल्या वस्तुंची निर्मिती व विक्री करते.