ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगप्रसिद्ध Apple या टेक कंपनीने आपल्या iPhone 11 मोबाईलचे भारतात उत्पादन सुरू केले आहे. चेन्नईच्या Foxconn च्या प्लांटमध्ये हे उत्पादन सुरु असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
ॲप्पल कंपनी पहिल्यांदाच आपल्या मोबाईलची भारतात निर्मिती करत आहे. यापूर्वी ॲप्पलने 2019 मध्ये iPhone XR ची जोडणी भारतात सुरू केली होती. 2017 मध्ये ॲप्पलने iPhone SE चे बंगळुरूमध्ये सुरु केले होते.
Foxconn ही ॲप्पलची प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. या कंपनीने भारतातल्या प्लांटच्या विस्तारासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. Pegatron ही देखील ॲप्पलची पुरवठादार कंपनी असून, तिनेही भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ॲप्पलला आता चीनवर अवलंबून रहावे लागणार नाही.