चेन्नईच्या फॉक्सकॉन प्रकल्पात सदरच्या फोनची निर्मिती ः कंपनीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल भारतामध्ये आयफोन 14 ची निर्मिती करण्याचा प्रकल्प बनवत आहे. याचे उत्पादन नवीन आयफोनच्या चीनमधील सादरीकरणानंतर दोन महिन्यांनंतर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हा पर्याय निवडण्यामागे नवीन फोनच्या जुन्या आवृत्तीच्या तुलनेत उत्पादनामध्ये 6 ते 9 महिन्यांचा होणारा उशीर कमी करण्यासाठी आहे.
ऍपल दीर्घ कालावधीपासून भारतामध्ये आयफोन बनवत आहे, परंतु नवीन मॉडेलचे उत्पादन कायमच उशिरा सुरु होते. आगामी काळात ग्राहकांना कमी वेळेत उत्पादन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये आयफोन 14 चे उत्पादन घेणार असल्याच्या बातमीनंतर रेडिंग्टन इंडिया लिमिटेड यांचे समभाग सकाळी 11 वाजता 10 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. तर मागील तीन आठवडय़ामध्ये समभागात सर्वाधिक वाढ असल्याची माहिती आहे. रेडिंग्टन इंडिया लिमिटेड आयटी उत्पादन आणि मोबाईल हॅण्डसेट पुरवठा व ऍपलची उत्पादन रीसेलर कंपनी आहे.
भारतामधून पहिला आयफोन-14 नोव्हेंबरपर्यंत
आयफोन उत्पादक फॉक्सकॉन टेक्नालॉजी गुप यांनी चीनच्या शिपिंग कॉम्पोनंटच्या प्रोसेस स्टडी आणि चेन्नईच्या बाहेर असणाऱया प्रकल्पांमध्ये आयफोन 14 या उपकरणाला असेंबल केले आहे. भारतामधून पहिला आयफोन 14 मॉडेल ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत मिळणार असल्याचे संकेत आहेत.
2017 पासून भारतात तयार होत आहे आयफोन
ऍपल आणि फॉक्सकॉन यांच्याकडून एकत्रितरित्या चालू वर्षांमध्ये भारतात एकाचवेळी उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. यामध्ये ऍपलच्या पार्टनरने 2017 मध्ये भारतात आयफोन निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
फिचर्स ः
w 14 मॅक्समध्ये 3,279 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
w प्रो मॉडेलमध्ये ऑन डिस्प्ले फिचर
w 6.1 इंचाची स्क्रीन राहणार
w ऍपल 116 बायोनिक चिप