वृत्तसंस्था /मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव 16 डिसेंबरला बेंगळूरमध्ये आयोजित केल्याची माहिती विश्वसनीय गोटातून देण्यात आली आहे.
तब्बल तीन वर्षानंतर आयपीएल स्पर्धा पुन्हा भारतात खेळवली जाणार आहे. मध्यंतरी कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा विदेशात आयोजित केली होती. 2023 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होईल. 2022 च्या आयपीएल स्पर्धेसाठी प्रत्येक संघासाठी खेळाडूंच्या लिलावाकरिता 90 कोटी रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. पण 2023 च्या आयपीएल स्पर्धेसाठी ही मर्यादा आता 95 कोटी (म्हणजेच 5 कोटीने वाढ) राहिल. आगामी आयपीएल स्पर्धेत 10 संघांचा समावेश राहण्याची शक्यता आहे.