Tarun Bharat

आयपीएल स्पर्धा जुन्या पद्धतीप्रमाणे खेळविणार

Advertisements

बीसीसीआय अध्यक्ष गांगुली, महिला आयपीएलचे मार्चमध्ये आयोजन

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

आयपीएलच्या नव्या मोसमात होम व अवे या जुन्या फॉरमॅटप्रमाणे सामने खेळविले जाणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना कळविले आहे.

2020 मध्ये कोरोनाच्या उद्रेक झाल्यानंतर आयपीएलमधील सामने केवळ मोजक्या केंद्रावर प्रेक्षकांविना खेळविले जात होते. 2020 मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये दुबई, शारजाह, अबु धाबी या तीन केंद्रावर सामने खेळविले गेले. त्यानंतर 2021 मध्येही भारतातील दिल्ली, अमहदाबाद, मुंबई, चेन्नई या चार केंद्रावर सामने खेळविण्यात आले होते. कोरोनाचा बहर ओसरला असल्याने आता जुन्या पद्धतीप्रमाणे सामने खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून प्रत्येक संघ घरच्या व प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सामने खेळणार असल्याचे गांगुली यांनी म्हटले आहे. याशिवाय यावर्षी देशी क्रिकेटही 2020 नंतर प्रथमच पूर्णपणे खेळविले जाणार आहे. त्यातही आता होम व अवे सामने आधीच्या पद्धतीप्रमाणे खेळविले जातील.

महिला आयपीएल पुढील वर्षीपासून

महिलांची आयपीएल स्पर्धा पुढील वर्षीपासून सुरू करण्यासाठी बीसीसीआयने काम सुरू केले असून दक्षिण आफ्रिकेत होणारी महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर पुढील वर्षी मार्चमध्ये त्याचे आयोजन होण्याची शक्यता असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने याआधीच दिले आहे. महिला आयपीएलमुळे देशातील महिला क्रिकेटचा दर्जा आणखी उंचावण्याची आशा गांगुली यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय या मोसमापासून 15 वर्षांखालील मुलींसाठीही वनडे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 26 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत बेंगळूर, रांची, राजकोट, इंदोर, रायपूर व पुणे या पाच केंद्रावर घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

कोरोनाग्रस्तांसाठी कोहली, डिव्हिलीयर्सकडून मदत

Patil_p

जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न भंगले

Patil_p

भारतीय हॉकी संघाचा जपानवर दणदणीत विजय

Patil_p

नागलचा सलामीचा सामना मार्कोराशी

Patil_p

विश्व संघटनेकडून अमेरिकन बॅडमिंटन स्पर्धा तहकूब

Patil_p

डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेतून सायना काश्यपची माघार

Patil_p
error: Content is protected !!