वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी स्पर्धा आयोजकांनी कोचित 23 डिसेंबरला क्रिकेटपटूंचा मिनी लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्पर्धा आयोजकांनी क्रिकेटपटूंच्या लिलावासाठी फ्रांचायझींच्या रकमेमध्ये थोडा बदल केला आहे.
या आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघांच्या फ्रांचायझींच्या पूर्वीच्या एकूण रकमेमध्ये (बजेट) 5 कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे फ्रांचायझींना आता या बोलीसाठी 95 कोटी रुपयांपर्यंत मर्यादा राहिल. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट मंडळाने या स्पर्धेसाठी विविध संघांच्या खेळाडूंना मुक्त करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएल क्रिकेटपटूंच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फ्रांचायझींची सुमारे 3.45 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिली होती तर लखनौ सुपर जायंटसने आपली सर्व रक्कम संपवली होती. गतवर्षी या स्पर्धेत गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावले होते.