Tarun Bharat

43 हजार कोटींना विकले IPL मीडिया राईट्स

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

इंडियन प्रीमिअर लीगच्या टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्कांसाठी रविवारपासून सुरू झालेली लिलाव प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. 2023 ते 2027 या पाच हंगामासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क विकण्यात आले असून, हा व्यवहार 43 हजार 255 कोटींना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामानंतर बीसीसीआयने पुढील पाच वर्षांसाठी माध्यमांचे हक्क विकण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. पहिल्या दिवशी ए आणि बी पॅकेजसाठी जोरदार बोली लागली. दुसऱ्या दिवशी त्यात वाढ करून कंपनीच्या वतीने बोली लावण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी नेटवर्कला पुढील पाच वर्षांसाठी या स्पर्धेचे हक्क मिळवण्यात यश आले आहे. ज्या कंपनीला आयपीएल प्रसारण हक्क प्राप्त होतात, त्यांच्याच टीव्ही किंवा डिजीटल प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे सामने दाखवले जातात.

आयपीएलचे सामने टीव्हीवर प्रसारित करणारे हे चॅनेल बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 57.5 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करणारी कंपनी बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 48 कोटी रुपये देणार आहे. यानुसार आयपीएलच्या एका सामन्याची किंमत 105 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. 2023 ते 2027 या काळात भारतात सामन्यांचे प्रसारण करणाऱ्या कंपन्या (टीव्ही आणि डिजिटल) बीसीसीआयला एकूण 43, 255 कोटी रुपये देणार आहेत. या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी वायकॉम 18, सोनी, स्टार इंडिया आणि झी ग्रुपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.

Related Stories

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रूस यांची वर्णी; आदित्य ठाकरेंचं ट्वीट चर्चेत

Archana Banage

उत्तर प्रदेश : भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

मुंबई कस्टमची मोठी कारवाई, २७ किलो ड्रग्स जप्त

Archana Banage

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रोनाल्डोचे सर्वाधिक गोल

Amit Kulkarni

दुर्गापूजा मंडपाला आग, 5 जणांचा होरपळून अंत

Omkar B

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानावर

datta jadhav