Tarun Bharat

दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट

Advertisements

ऑनलाईल टीम/तरुण भारत

ips rashmi shukla and cm eknath shinde meet : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी गुरुवारी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आणि त्यामुळे त्या मुंबईत परतल्याच्या चर्चांना उधाण आले. शुक्ला सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याविरुद्ध मुंबईत बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी तीन एफआयआर दाखल आहेत. 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. याआधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १८ ऑगस्ट रोजी मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेट घेतल्यानंतर शुक्ला यांनी आता मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.

दरम्यान शुक्ला आणि मुख्यमंत्री यांच्या झालेल्या भेटीबाबत विचारले असता, शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले ही ‘सौजन्य भेट’ होती. त्यामुळे या बैठकीकडे इतर कोणत्याही दृष्टिकोनातून पाहू नये. मुख्यमंत्री दिल्लीत असताना महाराष्ट्र केडरचे अधिकारी त्यांना भेटत असतात.

हे ही वाचा : मुंबईला पुन्हा बॉम्बने उडविण्याची धमकी

रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार?
रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत.

त्यांनी 17 ऑगस्ट रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर असताना भाजप नेते मोहित कंबोजही तिथे पोहोचले होते. त्यामुळे विरोधकांनी यावरून टीकास्त्र सोडले होते. तर शुक्ला यांनी हे आरोप फेटाळले होते. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि मी एक पोलीस अधिकारी आहे. त्यामुळे मी फडणवीसांची अधिकृत भेट घेतली. या भेटीचा आणि मोहित कंबोज यांचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रश्मी शुक्ला यांनी एबीपी माझाला दिली होती.

Related Stories

पहाटे उठून भूमिका जाहीर करणार नाही! जे तुमच्या मनात ते माझ्या; खा. संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Shinde

सेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी

datta jadhav

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘स्मार्ट’ होऊन काम करावे : अजित पवार

Rohan_P

सोनियाच्या पावलांनी आली गौराई

Abhijeet Shinde

पुण्यात स्कूलबस चालकांच्या कुटुंबांना धान्यरुपी मदत

Rohan_P

कायदे मागे घेईपर्यंत घरवापसी नाहीच !

Patil_p
error: Content is protected !!