वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बाजारात नवीन आयकू नियो 6 या नावाने लाँच केला आहे. फोन पॉवरफूल असून यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 870.5 जी प्रोसेसर मिळणार आहे.
12जीबी रॅमसोबत फोन येणार असून गेमिंग प्रेमींसाठी फोन विशेष डिझाईनसह सादर करण्यात आला आहे. आयकू नियो 6 दोन मॉडेलमध्ये भारतीय बाजारात दाखल करण्यात आला असून यामध्ये 8जीबीसह 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. ज्यामध्ये 12जीबीसह 265 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 33,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ऍमेझॉन व आयकूच्या स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने हा फोन दोन रंगामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये डार्क नोवा आणि सायबर रेज याचा समावेश होतो. फोनमध्ये दोन वर्षात अँड्रॉईड अपडेट आणि 2 वर्षाच्या अंतिमपर्यंत सिक्युरीटी अपडेट मिळणार आहे.
आयकू नियो 6ची वैशिष्टय़े
w आयकू नियो 6 मध्ये 6.62 इंच अमोलेड डिस्प्ले 120 हर्ट्ज रिप्रेश रेट राहणार
w फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 870 जी प्रोसेसर मिळणार आहे. जो 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह असेल.
wफोनमध्ये 64 मेगापिक्सल ओआयएसचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा व 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळणार आहे.