Tarun Bharat

Iran Hijab Row : ‘हिजाब’ विरोधात ७०० जणींना अटक, ४१ लोकांचा मृत्यू ; सोशल मीडियावरही बंदी

Advertisements

Iran Hijab Row : इराणमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळं २२ वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्यानं महिला संतापल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत आणि केस कापत त्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला हळूहळू वेगळं वळण लागलं आहे. पोलीस आणि प्रशासन महिलांवर आक्रमक कारवाई करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी ७०० हून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, इराण ह्युमन राइट्सनं दावा केलाय की, सुरक्षा कर्मचारी वगळता मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या ५४ आहे. मझांदरान आणि गिलान प्रांतांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इथं आंदोलन करणाऱ्या महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे.

सोशल मीडियावर बंदी
एवढंच नाही तर इराण सरकारनं व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम यांसारख्या संवाद माध्यमांवर बंदी घातली आहे. या कारवाईत शेकडो कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं मृतांची संख्या ४१ असल्याचं सांगितलं. तर इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला आग लावली असून त्यामुळं सर्वांवर ही कारवाई करण्यात येत आहे, असं स्पष्ट केलं.

Related Stories

दहशतवादी हाफिजचे बँक खाते पुन्हा सुरू

Patil_p

युवराजाला लस

Patil_p

ट्रम्प यांच्या 18 रॅलींमधून 30 हजार जणांना कोरोनाची बाधा; 700 जणांचा मृत्यू

datta jadhav

ब्राझीलमध्ये 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

देवसहायम यांना मिळाले संतपद

Patil_p

‘हे’ आहे ओमायक्रॉन संसर्गाचे नवे लक्षण

datta jadhav
error: Content is protected !!