Tarun Bharat

इराणमध्ये न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं; राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास दिला नकार

Advertisements

Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाबवरून सध्या वातावरण तापलं आहे. एका अमेरिकन महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. मुलाखतीची सर्व तयारी पूर्ण झाली असताना अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला. यावरून राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिल्याचा दावा सीएएन वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर (Christiane Amanpour) यांनी केला आहे.

नेमकं काय घडल

इराणमध्ये हिजाब सक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अटक केली होती. तिचा पोलीस कोठडीत धक्कादायक मृत्यू झाला. यानंतर राजधानी तेहरान आणि मशहादसह अन्य शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या. अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात अनेक ठिकाणी महिलांनी केस कापून हिजाब जाळला. दरम्यान आता इराणच्या राष्ट्रपतींनी न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने मुलाखत देण्यास नकार दिला. यावरून इराणमधील वातावरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

आमदार गीता जैन शिवसेनेत, मातोश्रीवर पार पडला पक्षप्रवेश

Rohan_P

ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

Abhijeet Shinde

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारी तिजोरीतून 6 कोटी!

Abhijeet Shinde

चर्चमधील गोळीबारात नायजेरियात 50 ठार

Patil_p

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!