ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लसीकरणानंतर प्रकृती बिघडलेला कोणताही आरोग्य विमाधारक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यास त्याचा खर्च विमा कंपन्यांना द्यावा लागेल, असे निर्देश इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDA) विमा कंपन्यांना दिले आहेत.
IRDAने म्हटले आहे की, आरोग्य विमाधारक व्यक्तीची कोरोना लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले, तर त्याचा खर्च संबंधित आरोग्य विमा कंपन्यांना द्यावा लागेल.
IRDAने काही दिवसांपूर्वीच आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कोविड-19 च्या उपचारांचा समावेश केला होता. त्यामध्ये कोरोना लसीकरणानंतरच्या खर्चाचा समावेश नव्हता.