Tarun Bharat

आयर्लंड संघाचा मोसमातील पहिला विजय

Advertisements

पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणवर 7 गडय़ांनी मात

वृत्तसंस्था/ बेलफास्ट

आयर्लंड क्रिकेट संघाने सलग आठ टी-20 सामन्यातील पराभवाची मालिका खंडित करताना येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा एक चेंडू बाकी असताना 7 गडय़ांनी पराभव करून मोसमातील पहिला विजय मिळविला.

जॉर्ज डॉकरेलने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी चौकार मारला. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी 19.5 षटकांत 3 बाद 171 धावा जमवित विजय साकार केला. या मोसमातील कोणत्याही क्रिकेट प्रकारातील आयर्लंडचा हा पहिला विजय आहे. याआधी त्यांना तीन वनडे सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला होता.

सलामीवीर पॉल स्टर्लिंग (29 चेंडूत 31) आणि सामनावीर कर्णधार अँड्रय़ू बलबिर्नी (38 चेंडूत 51) यांनी 7.3 षटकांत 61 धावांची भागीदारी करीत आयर्लंडला चांगली सुरुवात करून दिली. यष्टिरक्षक लॉरकॅन टकरने हा जोम कायम ठेवत 32 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हॅरी टेक्टर (नाबाद 25) व डॉकरेल (नाबाद 10) यांनी आयर्लंडचा या मोसमातील पहिला विजय शेवटच्या षटकात साकार केला.

तत्पूर्वी, स्पिनर डॉकरेल (7 धावांत 2 बळी) व बॅरी मॅकार्थी (34 धावांत 3) यांनी भेदक मारा करूनही अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 168 धावांची मजल मारली. शेवटच्या दोन षटकात अफगाणने 30 धावा फटकावल्या. इब्राहिम झद्रनने केवळ 18 चेंडूत नाबाद 29 धावा फटकावल्या तर सलामीवीर उस्मान घनीने सर्वाधिक 42 चेंडूत 59 धावा काढल्या. त्यात 6 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. या दोन संघांत एकूण पाच सामने होणार असून मालिकेतील दुसरा सामना आज गुरुवारी याच ठिकाणी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः अफगाणिस्तान 20 षटकांत 7 बाद 167 ः उस्मान घनी 42 चेंडूत 59, रहमानुल्ला गुरबाझ 22 चेंडूत 26, इब्राहिम झद्रन 18 चेंडूत नाबाद 29, नजिबुल्लाह झद्रन 10 चेंडूत 15, जॉर्ज डॉकरेल 2-7, बॅरी मॅकार्थी 3-34. आयर्लंड 19.5 षटकांत 3 बाद 171 ः अँड्रय़ू बलबिर्नी 38 चेंडूत 51, लॉरकॅन टकर 32 चेंडूत 50, पॉल स्टर्लिंग 29 चेंडूत 31, हॅरी टेक्टर नाबाद 25, डॉकरेल नाबाद 10, मुजीब उर रेहमान 1-22, नवीन उल हक 1-39, मोहम्मद नबी 1-27.

Related Stories

जडेजा-अश्विनवर आमचा फोकस असेल

Amit Kulkarni

जेव्हा नेटवर्कसाठी आयसीसी पंचांना झाडावर चढावे लागते!

Patil_p

नव्याने वर्चस्व गाजवण्यासाठी भारत सज्ज

Patil_p

ओडिशा स्पोर्ट्सचा सलग दुसरा विजय

Patil_p

दुखापतग्रस्त बुमराह ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

Patil_p

स्विटोलिना, कोंटावेट विजेते

Patil_p
error: Content is protected !!