वृत्तसंस्था/ कोलकाता
टाटा स्टील पुरस्कृत खुल्या इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अर्जुन इरिगेसीने ब्लिझ प्रकारातील जेतेपद पटकावताना हिकारू नाकामुराला मागे टाकले. बुद्धिबळाच्या या प्रकारामध्ये महिलांच्या विभागात आर. वैशालीने अजिंक्मयपद मिळविले आहे.
पुरुषांच्या विभागात अर्जुन इरिगेसीने 12.5 गुणांसह प्रथम स्थान आणि जेतेपद पटकाविले. इरिगेसीने अमेरिकेच्या नाकामुराचा शेवटच्या फेरीतील लढतीत शेवटच्या चालीत पराभव करत पूर्ण एक गुण वसूल केला. बुद्धिबळाच्या ब्लिट्झ प्रकारातील शेवटच्या फेरीतील निहाल सरीनबरोबरचा डाव इरिगेसीने बरोबरीत रोखला. महिलांच्या विभागात भारताच्या आर. वैशालीने 13.5 गुणांसह जेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये रॅपिड विभागात निहाल सरीनने 6.5 गुणांसह जेतेपद, अर्जुन इरिगेसीने 6 गुणांसह दुसरे, महिलांच्या विभागात ऍना युशेनिनाने 6.5 गुणांसह पहिले तर नेना डिगेनेझीने दुसरे स्थान मिळविले.