काला चित्रपटात दिसणार तृप्ति डिमरी
दिवंग अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल याचा चित्रपट लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 1 मिनिटे 6 सेकंदांच्या या टीझरमध्ये एक युवती गायन करताना दिसून येते. काला हा चित्रपट एक गूढपट असल्याचे समजते.
बाबिलसोबत या चित्रपटात बुलबुल फेम अभिनेत्री तृप्ति डिमरी, स्वस्तिका मुखर्जी, आशीष सिंह, नीर राव आणि राज शर्मा हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर बाबिलने व्हिडिओ शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे. एक अभिनेता म्हणुन माझा पूर्ण प्रवास चांगला का वाई हे ठरविण्याचा निर्णय जनता घेणार आहे. चित्रपट दिग्दर्शिका अन्विता यांच्यासोबत कारकीर्दीची सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला सुदैवी समजत असल्याचे बाबिलने म्हटले आहे.