Tarun Bharat

अल-कायदानंतर ‘आयएस-के’ची धमकी

Advertisements

संधी मिळताच भारतावर हल्ला करण्याचा इशारा

काबूल / वृत्तसंस्था

अफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेट-खोरासानने (आयएस-के) भारतावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी ‘आयएस-के’ने आपल्या अलआझम फाउंडेशनवर वृत्तनिवेदन जारी करत केली आहे. ‘आयएस-के’ने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये भारताला धमकीचा संदेश देण्यात आला.

पहिल्या बुलेटिनमध्ये भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा व्हिडीओ दिसत आहे. गेल्या आठवडय़ात देशातील विविध शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचारही दिसून आला होता. तसेच देशात गेल्या काही दंगलींमध्ये सामील असलेल्या लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवतानाही दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये ‘आयएस-के’मध्ये सहभागी असलेल्या भारतीय सैनिकांची प्रक्षोभक विधानेही आहेत. ‘आयएस-के’च्या व्हिडीओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख आहे. तसेच ‘आयएस-के’ने तालिबानचाही निषेध केला आहे. एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याबद्दल ‘आयएस-के’ने तालिबान राजवटीचे प्रभारी संरक्षण मंत्री मुल्ला याकुब यांचा निषेध केला. अफगाणिस्तानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्र्यांची भारतीय अधिकाऱयांसोबत झालेली बैठकही चुकीची असल्याचा उल्लेख त्यात आहे.

यापूर्वी अल-कायदाकडून धमकी

गेल्या आठवडय़ात अल-कायदा या दहशतवादी संघटनेनेही भारतात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश दिला होता. अल कायदाने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट करून मोहम्मद पैगंबरावरील वादग्रस्त वक्तव्याचा बदला घेण्याचा इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी तालिबानी सुरक्षा दलाच्या कारवाईत ‘आयएस-के’चा कमांडर मारला गेला होता. त्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. या कमांडरने मे महिन्यात अफगाणिस्तानातील काबूल आणि बाल्ख येथे झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.

तालिबानी राजवटीच्या विरोधात ‘आयएस-के’

तालिबान आणि ‘आयएस-के’ त्यांच्या वेगवेगळय़ा विचारसरणीमुळे आधीच एकमेकांशी विरोधक आहेत. तालिबानच्या पाश्चिमात्य देशांबद्दलच्या मवाळ भूमिकेमुळे आयएस-के आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटना तालिबान राजवटीवर नाराज आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीसाठी ‘आयएस-के’ पासून धोका कायम आहे.

Related Stories

पाकिस्तान : नवे दिशानिर्देश

Patil_p

जपानच्या क्षेत्रात चिनी पाणबुडीची घुसखोरी

Patil_p

युक्रेनमध्ये रशियाने उतरवले ‘निर्दय’ योद्धे

Patil_p

परिस्थितीचे योग्य भान राखा!

Patil_p

एका छोटय़ा छिद्रात सामावते नदी

Patil_p

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage
error: Content is protected !!