Tarun Bharat

नोटाबंदीचा मुद्दा अद्याप जिवंत आहे का?

Advertisements

नोटाबंदीविरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवरील सुनावणी टळली आहे. केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवर 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश एस. अब्दुल नजीर, बी.आर. गवई, ए.एस. बोपन्ना, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी.व्ही. नागरत्न यांच्या घटनापीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना हा मुद्दा अद्याप जिवंत आहे का अशी विचारणा केली.

न्यायालयात हा मुद्दा टिकणार नाही, हा एक वादाचा विषय ठरणार असून त्यावर युक्तिवाद करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये 500 अन् 1000 च्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱया एकूण 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

नोटाबंदीचा विषय अद्याप जिवंत (तीव्रता) असून न्यायालयाने यावर सुनावणी करावी असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने नमूद केले. याप्रकरणात दोन पैलू असून पहिला निर्णयाची वैधता आणि नोटाबंदीच्या अंमलबजावणीशी निगडित समस्या दुसरा पैलू असल्याचे घटनापीठाने म्हटले आहे.

या याचिकांवर विचार करण्याची आवश्यकता आहे का हे पाहिले जाणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट पेले आहे. याचिका एका तात्विक प्रक्रियेच्या दृष्टीकोनातून दाखल करण्यात आली असल्यास त्याची दखल घेतली जाणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Related Stories

अमरनाथ यात्रेवर शस्त्रात्रांच्या तस्करीचे संकट

Kalyani Amanagi

राष्ट्रपती निवडणूकीसाठी १८ जुलै रोजी मतदान

Archana Banage

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जनजागृती करण्यासाठी उतरले रस्त्यावर

Abhijeet Khandekar

प्रतिदिन 415 जीव वाचविण्याचे लक्ष्य

Patil_p

तृणमूलच्या आमदाराची मतदारांनाच धमकी

Patil_p

जम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन

Patil_p
error: Content is protected !!