Tarun Bharat

ईशा गुप्ताला व्हायचे होते वकील

Advertisements

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अशी ओळख

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला एका गोष्टीची खंत वाटत आहे. बालपणातील एक इच्छा पूर्ण न झाल्याची खंत तिला आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी मी ऍडव्होकेट होण्यासाठी पूर्णपणे तयार होते. त्यावेळी मी कायद्याचे शिक्षण घेत होते. अभिनयाचे शिक्षण न घेता स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत वकील होण्याचा निर्णय मी घ्यायला हवा होता असे उद्गार तिने एका मुलाखतीत काढले आहेत.

ईशाने 2012 साली ‘जन्नत 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हापासून ती बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख टिकवून आहे. ईशाला अलिकडेच ‘आश्रम 3’ या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत पाहिले गेले होते. प्रकाश झा यांच्याकडून दिग्दर्शित ‘आश्रम 3’ सीरिज 3 जून रोजी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली होती.

कायद्याचे शिक्षण घेत असताना मी एक अभिनेत्री होऊ शकते असे वाटू लागले. स्वतःसाठी जे आहे ते मिळतेच असा मला विश्वास असल्याचे ती सांगते. ईशाने एलएलबी पूर्ण केली आहे. कधीकाळी अभिनेत्रीच्या ऐवजी तिला वकील व्हायचे होते.

Related Stories

‘वागले की दुनिया’ ‘बेस्ट शो ऑन इंडियन टेलिव्हिजन’

Patil_p

विकी कौशल होणार ‘सॅम बहादुर’

Patil_p

गुळुंब ग्रामपंचायतीने दिला स्टार प्रवाहाला झटका

Patil_p

शाहरूख खानच्या क्लास ऑफ 83 मध्ये मराठमोळा पृथ्विक प्रताप

Patil_p

झी मराठीवर पहिला वजनदार डान्सिंग शो

Patil_p

ऑस्करच्या शर्यतीत ‘जल्लिकट्टू’ बाहेर

Patil_p
error: Content is protected !!