तरुण भारत

इशा सिंग, सौरभ चौधरी यांना नेमबाजीत सुवर्ण

वृत्तसंस्था/ सुहेल (जर्मनी)

आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गुरूवारी भारताचे नेमबाज इशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे भारताच्या पलक आणि सरबज्योत सिंग यांनी या क्रीडाप्रकारात रौप्यपदक घेतले.

Advertisements

मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजीत इशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत आपल्याच देशाच्या पलक आणि सरबज्योत सिंग यांचा 16-12 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रमिता आणि पार्थ माखिजा यांनी रौप्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत पोलंडच्या ज्युलीया आणि व्हिक्टर या जोडीने भारताचा रमिता आणि पार्थ यांचा 17-13 असा पराभव केला. गुरूवारी भारताने या स्पर्धेत तीन पदके मिळविली. स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत फ्रान्स आणि पोलंड यांनीही सुवर्णपदके मिळविली आहेत.

Related Stories

भारताचा हॉलंडवर 5-2 ने विजय

Patil_p

शकीब अल हसन बॅटचा लिलाव करणार

Patil_p

नेदरलँडस्ची एकतर्फी बाजी

Patil_p

अमीत खत्रीचा राष्ट्रीय विक्रम

Amit Kulkarni

पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिका विजयी

Patil_p

यू मुम्बा, पाटणा पायरेट्स, दबंग दिल्ली संघांचे विजय

Patil_p
error: Content is protected !!