एसटीएफला मिळाले मोठे यश
वृत्तसंस्था /सिलीगुडी
पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सने एका संशयित हेराला जलपाईगुडी जिल्ह्यातील सिलीगुडीमधून अटक केली आहे. अटकेतील आरोपी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी काम करत होता. आरोपीने मागील अनेक वर्षांपासून आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा संशय असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे. संशयित आरोपी स्वतःच्या पत्नीसोबत सिलीगुडीयच भारत नगर भागात भाडय़ाच्या घरात राहत होता. हा आरोपी मूळचा बिहारच्या चंपारण्य जिल्हय़ाचा रहिवासी आहे. जलपाईगुडी येथील न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सिलीगुडी तसेच परिसरातील सैन्यासोबत व्हीव्हीआयपींच्या हालचालींशी निगडित माहिती आरोपी आयएसआयला पुरवत होता. याकरता तो विशेष तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळय़ा संकेत चिन्हांचा वापर करायचा. आरोपीचे आणखी कुणी साथीदार आहेत याचा तपास आता केला जात आहे.