Tarun Bharat

ISIS-K च्या निशाण्यावर पाकिस्तान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आयसिस-खुरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेला जगभरात शरीयत कायदा लागू करायचा आहे. जगभरात इस्लाम किंवा कुराणच्या विरोधात जाणाऱ्यांना आयसिस-केचा सामना करावा लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबान शासन असतानाही पाकिस्तान या देशावर 80 टक्के हुकुमत करत होता. असे असूनही पाकिस्तानला अफगाणिस्तानात इस्लामची अंमलबजावणी करता आली नाही, त्यामुळे पाकिस्तान आमच्या निशाण्यावर असून, पाकिस्तानला आम्ही बरबाद करू, असे या संघटनेने म्हटले आहे.

आयसिस-के मध्ये सामील झालेल्या नाझीफुल्ला यांनी एका मीडिया हाऊसला सांगितले की, आम्हाला जगभरात शरीयत कायदा लागू करायचा आहे. पैगंबरांच्या वास्तव्याप्रमाणेच लोकांनी ही जगावं अशी आमची इच्छा आहे. त्यांनी जसे कपडे घातले होते. सर्व काही सारखेच होऊ द्यावे. आम्हाला माहित आहे की सध्या आमच्याकडे लढण्यासाठी फारसे काही नाही, परंतु जर आम्हाला काही मिळाले तर आम्हाला पाकिस्तानात जाऊन लढायचे आहे. तालिबानपेक्षा आम्ही कमी ताकदीचे आहोत, पण लढण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार अफगाणिस्तानातील तालिबान्यांची संख्या जवळपास 70,000 आहे, तर आयसिसच्या सदस्यांची संख्या 2,000 आहे.

Related Stories

अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला मोठी मदत

Amit Kulkarni

दफनभूमीत जोडप्याचे प्री-वेडिंग फोटोशूट

Amit Kulkarni

माझे वडिल कुठे आहेत?

Patil_p

कोरोनामुळे पर्यटन उद्योगाचे 320 अब्ज डॉलरचे नुकसान : संयुक्त राष्ट्र

datta jadhav

दियागो माराडोनांचे घडय़ाळ आसाममध्ये हस्तगत

Patil_p

शांततेसाठी पुढाकार घेतलेल्या उद्योजकावर विषप्रयोग

Patil_p