ऑनलाईन टीम / श्रीनगर :
इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर (ISJK) या दहशतवादी संघटनेच्या कमांडरला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, आठ काडतुसे आणि 1 लाख 13 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मलिक उमेद अब्दुल्ला असे या कमांडरचे नाव असून, तो यारीपोरा, कुलगाम येथील रहिवासी आहे.
मलिक अब्दुल्ला जम्मू-काश्मीरच्या झज्जर कोटली भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागात सापळा रचला. एका वाहनाच्या तपासणीदरम्यान मलिकने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.