प्रतिनिधी/ इस्लामपूर
अंनत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकाऱ्यांनी झिंगाट डान्स केला. इस्लामपूर पोलीस ठाणे व तालुक्यातील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.
दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्याची मिरवणूक निघाली. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, प्रविण साळुंखे, चेतन माने, अरविंद काटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर यांच्यासह ठाण्यातील सर्व पोलीस व महिला पोलीस यांनी डिजेवर ठेका धरला. यावेळी पोलीसांच्या अंगावर वर्दी नव्हती तर पारंपारिक पध्दतीने कुर्ता, फेटे गुंडाळून मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. गणपती उत्सवासाचा गेल्या १०–१५ दिवसांचा पोलीसांच्यावरील ताण कमी झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. सण- उत्सवात कायम बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना असा आनंदोत्सव साजरा करताना पाहून शहरवासीयांना आनंद झाला.