Tarun Bharat

सापांसाठी प्रसिद्ध बेट

ब्राझीलच्या या बेटावर सापाच्या अनेक प्रजाती

स्नेक आयलँड ब्राझीलच्या किनाऱयापासून काही अंतरावरच आहे. या बेटावर तुम्हाला पावला पावलावर साप दिसून येतील. जगातील सर्वात विषारी साप येथेच आढळून येतात. गोल्डन लँसहेड साप केवळ येथेच आढळून येतो. सापाची ही प्रजाती अत्यंत घातक असल्याने या बेटावर जाण्याचे धाडस कुणीच करत नाही.

स्नेक आयलँडचे खरे नाव इल्हा दा क्यूइमाडा ग्रांडे आहे. हे साओ पावलोपासून केवळ 90 मैलाच्या अंतरावर आहे. या बेटावर लोक जाऊ शकत नाहीत. बेटावर जाण्याची अनुमती कुणाला द्यावी याचा निर्णय ब्राझीलचे नौदल घेत असते. काही वैज्ञानिक आणि नौदलाचे अधिकारीच या बेटावर जाऊ शकतात.

हे बेट सापांसाठी ओळखले जाते, यात गोल्डन लँसहेड अन् बोथ्रोप्स इंसुलारिस देखील सामील आहे. या सापांचे भक्ष्य प्रामुख्याने पक्षी ठरतात. याचमुळे यांचे विष अत्यंत जहाल असते. सर्पदंश झाल्यावर पक्षी त्वरित मरून जातो. गोल्डन लँसहेड स्वतःच्या शिकारीचा माग काढू शकत नाहीत, याचमुळे त्यांचे विष अत्यंत घातक असते.

या बेटावर दर चौरस मीटरवर 5 सापांचे वास्तव्य आहे. येथे धोकादायक सापांचे प्रमाण अधिक असल्याने पक्ष्यांचे तेथील प्रमाण कमी झाले आहे. परंतु स्थलांतरित पक्षी येथे थांबत असतात आणि हेच पक्षी या सापांचे भक्ष्य ठरतात.

गोल्डन लँसहेड सापाला सर्वात घातक मानले जाते. याचमुळे वैज्ञानिकदृष्टय़ा यावर संशोधन केले जाते. तसेच या सापांची शिकारही केली जाते. या सापांची अवैध तस्करी केली जात असते. या बेटावर एक लाइट हाउस देखील आहे. 1909 आणि 1920 दरम्यान स्नेक आयलँडवर लाइटहाउस कीपर आणि त्याचे कुटुंब राहत होते. सापांमुळे हे कुटुंब संपल्याचे बोलले जाते.

Related Stories

8 पत्नींसह एकाच घरात राहणारा अवलिया

Patil_p

इम्रान खानचा पाय अधिकच खोलात

Patil_p

आर्मेनियाला वाचवू शकणार नाहीत भारतीय क्षेपणास्त्र

Patil_p

मेक्सिकोमध्ये 12,153 नवे कोरोनाबाधित; 1,707 मृत्यू

Tousif Mujawar

न्यूयॉर्क प्रांतामधील मैदाने खुली होणार

Patil_p

चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना मारणार ही अफवाच

prashant_c