इस्राईल कृषी क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. नुकतेच राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इस्राईलचं पर्यटन मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार नुकताच झाला आहे.
यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी. जी. पाटील, इस्राईल पर्यटन मंत्रालयाचे संचालक सॅमी याहिया यांच्यासह तज्ञ मान्यवर उपस्थित होते.
इस्राईलमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या २० टक्के क्षेत्रावर शेती करण्यात येते. भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे इस्राईलसारख्या देशांना निर्यातीसाठी या करारामुळे चालना मिळेल. अशी माहिती डॉक्टर पी. जी. पाटील यांनी दिली.
सॅमी याहिया यांनी इस्राईलमधील इंजिनिअरिंग, शेतीसाठी आधुनिक पद्धती, जैविक कीडनाशकं याबद्दल माहिती सांगितली.