जेरूसलेम
लेबनॉनसोबत सागरी सीमेवरून ‘ऐतिहासिक करार’ करण्यात आल्याची मातिही इस्रायलचे पंतप्रधान येर लापिद यांनी मंगळवारी दिली आहे. या दोन्ही देशांच्या चर्चेत अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका बजावली होती. लेबनॉन सोबतचा हा करार म्हणजे ऐतिहासिक कामगिरी आहे. हा कराल इस्रायलच्या सुरक्षेला बळकट करणार आहे. तसेच इस्रायलच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ मिळवून देणार असल्याचे उद्गार लापिद यांनी काढले आहेत. इस्रायलच्या स्थापनेपासूनच त्याचा लेबनॉनसोबत सागरी सीमेवरून वाद आहे. दोन्ही देश भूमध्य समुद्राच्या सुमारे 860 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रावर दावा करतात.