Tarun Bharat

इस्रोकडून PSLV-C54 रॉकेटसह 8 नॅनो सॅटेलाईटचं प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ISRO launches 8 nano satellites with PSLV-C54 rocket भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज PSLV-C54 रॉकेटसह अन्य 8 नॅनो उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 11.56 वाजता हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

PSLV-C54 रॉकेटमधून (‘EOS-06 Oceansat-3) आणि आठ छोटे सॅटेलाईट अंतराळात सोडण्यात आले. या रॉकेटमध्ये चार स्टेज आहेत. त्यामुळे इतर उपग्रहांना वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये लाँच करता येतं. पिक्सेलमधून आनंद आणि भूतानसॅट, ध्रुव अंतराळमधून दोन थायबोल्ट तर स्पेसफ्लाइट युएसएमधून चार अशा एकूण आठ छोट्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये भूतानसॅट, थायबोल्ट-1, थायबोल्ट-2, आनंद आणि चार ॲस्ट्रोसॅट या छोट्या उपग्रहांचा समावेश आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपग्रह भूतानसॅट। आहे. भूतानसॅट हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. हा नॅनो उपग्रह आहे. हा उपग्रह जमीन, रस्ते, रेल्वे ट्रॅक, पूल यासंबंधित माहिती गोळा करेल. तसेच या उपग्रहाला मल्टी स्पेक्ट्रल कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे साध्या फोटोंसह वेगवेगळ्या प्रकाश तरंगांच्या आधारे फोटो निघणार आहेत.

PSLV-C54 हे रॉकेट 320 टन वजनाचं आहे. त्याची लांबी 44.4 मीटर तर व्यास 2.8 मीटर आहे.

Related Stories

बेंगळूर: ‘या’ तारखेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण

Archana Banage

नितीन गडकरींना आलेला धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून- पोलीस आयुक्तांची माहिती

Archana Banage

राहुल गांधींची ईडी चौकशी असंवैधानिक, द्वेषपूर्ण : काँग्रेस

Abhijeet Khandekar

चालता फिरता कोल्डस्टोरेज

Patil_p

जिल्हा रुग्णालयातून हाकलले; उघड्यावरच झाली प्रसूती

datta jadhav

देशातील सर्वात मोठय़ा सरोवराचे अस्तित्व धोक्यात

Patil_p