ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation ) म्हणजे इस्रोने ( ISRO ) आणखी एक ‘गगन भरारी’ घेतली आहे. इस्रोने आज PSLV-C54 रॉकेटचे प्रक्षेपण केलं. ISTRO ने Oceansat-३ सह ८ नॅनो उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. श्रीहरिकोटा येथील अंतराळ स्थानकावरून PSLV-C54-ESO-06 रॉकेटने उड्डाण केलं आहे. या रॉकेटमधून Oceansat-3 (OceanSat 3) उपग्रह आणि 8 नॅनो उपग्रह (Nano Satellite Launch) सोडण्यात आले आहेत. तर इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही २४ वी मोहिम आहे.
ओशनसॅट ३ (Oceansat 3)
ओशनसॅट-३ (Oceansat 3) हा १ हजार किलो वजनाचा उपग्रह आहे. हा उपग्रह समुद्र आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रासह मित्र देशांच्या सागरी भागातील क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषणाची तपासणी करण्यास मदत करेल. या सॅटेलाईटमुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.


इस्रोची ही मोठी मोहिम आहे. यामध्ये हे रॉकेट उपग्रहांना दोन कक्षेत घेऊन जाणार आहे. उड्डाणानंतर २० मिनिटांनी ओशनसॅट उपग्रह पृथ्वीपासून ७४२ किमी उंचीवर सोडला जाईल. दरम्यान, शास्त्रज्ञ याला आतापर्यंतच्या सर्वात लांब मोहिमांपैकी एक मानत आहेत. यामध्ये रॉकेट उपग्रहाला दोन कक्षेत घेऊन जाईल. प्रक्षेपणाच्या २० मिनिटांनंतर, ओशन-सॅट पृथ्वीपासून ७४२ किमी उंचीवर सोडले जाईल. त्यानंतर ५१६ ते ५२८ किमी अंतरावर इतर उपग्रह अवकाशात सोडले जातील.
हे ही वाचा : गुणरत्न सदावर्तेंवर सोलापुरात शाईफेक