Tarun Bharat

तिन्ही भाषांमधून परिपत्रके द्या

Advertisements

माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : अधिकाऱयांच्या नजरअंदाजाबद्दल नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहरामध्ये मराठी भाषिकांबरोबरच उर्दू भाषिकही मोठय़ा संख्येने राहतात. 22 टक्क्मयांपेक्षा अधिक मराठी भाषिक राहत आहेत. त्यामुळे त्यांना कायद्यानुसार मराठीत परिपत्रके उपलब्ध करणे बंधनकारक आहे. मात्र, महानगरपालिकेमध्ये कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना समजणे अवघड झाले आहे. तेव्हा महानगरपालिकेतील सर्व कागदपत्रे तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करावीत, या मागणीसाठी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. यावेळी निवेदन घेण्यासाठी आलेले अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी या शिष्टमंडळाला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी भाषिक मोठय़ा संख्येने राहत असल्यामुळे त्यांना घराचा उतारा, कर पावती, पाणीपट्टी पावती हे सर्व मराठीत दिल्यानंतरच समजणार आहे. महापालिकेची नूतन इमारत बांधण्यात आली. त्याठिकाणी मराठी फलक काढून कन्नड भाषेमध्ये फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांना समजणे अवघड झाले आहे. तेव्हा संपूर्ण कागदपत्रे तसेच महापालिकेमधील फलकांवर कन्नडसह मराठी व इतर भाषांमध्येही लिहावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील चौकांमध्ये असलेल्या फलकांवर मराठी भाषेत लिहा

शहरातील चौकांमध्ये असलेल्या फलकांवर मराठी भाषेत लिहावे, बसवरही मराठीतच फलक लावावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कन्नडची सक्ती थांबवावी आणि बेळगावमध्ये जे भाषिक अधिक संख्येने राहतात, त्यांच्या भाषेत व्यवहार करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अधिकाऱयांकडून नजरअंदाज

निवेदन स्वीकारण्यासाठी अशोक दुडगुंटी आले. मात्र, त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. केवळ निवेदन घेतले आणि जिल्हाधिकाऱयांकडे याची माहिती देऊ, असे सांगितले. वास्तविक त्यांनी याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे होते. मात्र, जणू नजरअंदाज करत केवळ निवेदन स्वीकारले. यामुळे माजी नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित अधिकाऱयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

यावेळी माजी महापौर नागेश सातेरी, मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, सरिता पाटील, महेश नाईक, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, ऍड. अमर यळ्ळूरकर, ऍड. रतन मासेकर, माया कडोलकर, सुधा भातकांडे, मनोहर हलगेकर, गणेश ओऊळकर, गजानन पाटील, राकेश पलंगे, विनायक गुंजटकर, दिनेश राऊळ, दिलीप बैलूरकर यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

डॉ.सतीश याळगी यांचा सत्कार

Patil_p

जिल्हय़ातील 11 स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह

Patil_p

खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई थांबवा

Amit Kulkarni

गृहरक्षक हेदेखील कोरोना लढाईतील योद्धेच

Rohan_P

मच्छेतील डुकरांचा त्वरित बंदोबस्त करा

Amit Kulkarni

नवीन शिक्षण धोरणः २० ऑगस्ट रोजी कर्नाटक टास्क फोर्स अहवाल देणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!