Tarun Bharat

इसुझू मोटर्सची वाहने बाजारात उतरवण्याची योजना

Advertisements

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी इसुझू मोटर्स इंडिया यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 25 हजार वाहने उत्पादन करुन बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या कंपनीला भारतामध्ये अस्तित्वात येऊन जवळपास दशकाहून अधिक कालावधी लोटला असून यानिमित्ताने इसुझू मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वाटारु नाकानो यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या दहा वर्षापासून सदरची कंपनी भारतामध्ये आपली वाहने सादर करत असून अनेक आव्हानांना यादरम्यान कंपनीने सामोरे जात स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामध्ये तयार होणारी उत्पादने आता शेजारच्या गल्फसह इतर देशांनाही निर्यात केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. चालू वर्षामध्ये देशांतर्गत उत्पादनांतर्गत 50000 वाहनांचा टप्पा कंपनीने नुकताच पार केला आहे.

Related Stories

वीज मागणी 30 टक्क्यांनी घटली

Patil_p

आयपीओ अगोदरच ‘ओला’मध्ये मोठी उलथापालथ

Patil_p

नफा कमाईच्या दबावाने सेन्सेक्स कोसळला

Omkar B

मारुती इको गाडय़ा परत मागविणार

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्सचा टप्पा 39 हजार पार

Patil_p

फ्लिपकार्टकडून वॉलमार्ट इंडिया होलसेलचे अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!