Tarun Bharat

रोहित शर्माच्या जागी ईश्वरन

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने तो वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याचप्रमाणे आगामी दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतही तो उपलब्ध होण्याची शक्मयता दुरावली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी भारतीय संघामध्ये आता रोहित शर्माच्या जागी भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनला संधी देण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने पाठोपाठ शतके झळकविली असल्याने त्याला संधी मिळणार असल्याचे समजते. सिलेतमध्ये भारत अ संघाची दुसरी कसोटी संपल्यानंतर तो चेतोग्राममध्ये भारतीय संघात दाखल होईल. या कसोटी मालिकेसाठी संघाचे नेतृत्व के. एल. राहुलकडे सोपविण्यात येणार असून राहुल आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी फलंदाजीस येईल, असे प्रशिक्षक राहुल दविडने सांगितले. उभय संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून चेतोग्राम येथे प्रारंभ होणार आहे. ईश्वरनने भारत अ च्या पहिल्या कसोटीत 141 तर दुसऱया कसोटीत दुसऱया दिवसाअखेर तो 144 धावांवर खेळत आहे. बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार किंवा उमरान मलिक यापैकी एकाला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी कसोटी मालिकेसाठी संधी दिली जाईल.

Related Stories

भारतीय महिलांचा जर्मनीला धक्का

Patil_p

हॅलेपला हरवून ओस्टापेंको अंतिम फेरीत

Patil_p

अंतिम फेरी गाठत अन्शू मलिकचा नवा इतिहास

Amit Kulkarni

विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मुंबईचा निर्धार

Patil_p

मिल्खा सिंग यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

Patil_p

न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनव्हे फायनलमधून बाहेर

Patil_p