ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वैयक्तिक आयटी रिटर्न्स 30 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे.
कंपन्यांना देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या मागील वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत. इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 119 नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची ही मुदत वाढविण्यात आली आहे.