Tarun Bharat

आयटी कंपन्यांनी बाजाराला सावरले

सेन्सेक्स 443 अंकांनी मजबूत  : जागतिक बाजारात मिळता जुळता कल

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

 भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी घसरणीला विराम मिळत सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा सावरले असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्व घडामोडींमध्ये जागतिक बाजारात मिळता जुळता कल राहिल्याने देशातील शेअर बाजारात सेन्सेक्स 443 अंकांनी मजबूत राहिल्याचे दिसून आले.

दिवसभरातील मुख्य घडामोडीच्या परिणामामुळे बीएसई सेन्सेक्स 443.19 अंकांनी वधारत 0.86 टक्क्यांवर मजबूत होत निर्देशांक 52,265.72 वर बंद झाल्याचे दिसून आले. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 143.35 अंकांनी वधारत निर्देशांक 15,556.65 वर बंद झाला आहे.

जागतिक बाजारांतील सकारात्मक वातावरणात अमेरिकन फेडरल बँकेचे अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात नकारात्मक कर राहिला होता. यासोबतच शेअर बाजारात उत्साहाची स्थिती राहिल्याचे दिसून आले. या घडामोडीसह देशातील बाजारात लघू व मध्यम क्षेत्रातील व्यवसायांमधील गती कायम राहिल्याचाही लाभ यावेळी शेअर बाजाराला झाल्याचे दिसून आले.

विदेशी संस्थांकडून गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा प्रवास कायम राहिल्याने स्थानिक बाजारांमधील तेजीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे चीनमधील बाजारात जास्तित जास्त आशयातील बाजारात सकारात्मक कल राहिल्याचे पहावयास मिळाले. याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय बाजारावर पडल्याचे दिसून आले.

मुख्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक 6.33 टक्क्यांनी गुरुवारी मजबूत राहिल्याचे दिसून आले. यासह महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 4.41 ने तेजीत राहिले. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, भारती एअरटेल, टीसीएस, इन्फोसिस, सन फार्मा, विप्रो, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक 1.62 टक्क्यांनी प्रभावीत झाले. एनटीपीसी व पॉवरग्रिड यांचे समभागही घसरणीसह बंद झाले आहेत.

जगातील मुख्य बाजारात आशियातील जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग यांचा निर्देशांक व चीनचा शांघाय कम्पोजिट हे मजबूत राहिले. दुसरीकडे युरोपच्या बाजारात दुपारपर्यंत  घसरण राहिली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 1.92 टक्क्यांनी घसरुन 109.60 डॉलर प्रति बॅरेलवर भाव राहिले होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • मारुती सुझुकी .. 8271
 • हिरोमोटो कॉर्प . 2674
 • आयशर मोटर्स… 2819
 • महिंद्रा अँड महिंद्रा 1027
 • बजाज ऑटो…… 3784
 • टाटा मोटर्स…….. 407
 • एशियन पेंटस्…. 2758
 • भारती एअरटेल… 660
 • टीसीएस………. 3308
 • सनफार्मा……….. 824
 • विप्रो…………….. 419
 • डिव्हीस लॅब्ज…. 3666
 • आयसीआयसीआय 699
 • सिप्ला…………… 933
 • अपोलो हॉस्पिटल 3850
 • नेस्ले………….. 16976
 • टेक महिंद्रा……… 991
 • इन्फोसिस…….. 1452
 • लार्सन टुब्रो……. 1494
 • अदानी पोर्टस्…… 675
 • बजाज फिनसर्व्ह 11552
 • इंडसइंड बँक……. 784
 • कोटक महिंद्रा…. 1684
 • एसबीआय………. 451
 • डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4294
 • बीपीसीएल…….. 307
 • टायटन………… 2041
 • ऍक्सिस बँक…….. 629
 • टाटा स्टील……… 841
 • एचडीएफसी बँक 1335
 • हिंडाल्को………… 317
 • ब्रिटानिया…….. 3411
 • एचडीएफसी….. 2164
 • श्री सिमेंटस…. 18533
 • बजाज फायनान्स 5448
 • अल्ट्राटेक सिमेंट. 5410

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • रिलायन्स……… 2464
 • कोल इंडिया…….. 177
 • पॉवरग्रीड कॉर्प…. 208
 • एनटीपीसी……… 136
 • ग्रेसीम    1316

Related Stories

ऍमेझॉनच्या युपीआय ग्राहकांची संख्या 5 कोटीवर

Patil_p

पहिल्या दिवशी सेन्सेक्स 173 अंकांनी मजबूत

Patil_p

देशातील अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर

Patil_p

अमेरिकेत व्याजदर वाढ ; आता आरबीआयकडे लक्ष

Patil_p

भारतीय शेअर बाजारात तेजी परतली

Amit Kulkarni

सक्रीय ग्राहक संख्या जोडण्यात एअरटेल अव्वल

Amit Kulkarni
error: Content is protected !!