Tarun Bharat

विमानतळ नामकरणाबाबत केंद्र घेईल तो निर्णय मान्य

मगो नेते, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे मत

प्रतिनिधी /पणजी

मोप विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी मगो पक्षातर्फे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुढे मनोहर पर्रीकर यांच्याही नावाचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने पाठविला. त्यामुळे आता तो निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारच्या हाती आहे. त्यामुळे केंद्र घेईल तो निर्णय आम्हाला, मगोला मान्य असेल, असे मत मगो नेते तथा वीजमंत्री  सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

मंगळवारी पणजीत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी मोप विमानतळाच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मगो पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मोप विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्याची मागणी करणारा ठराव गत नोव्हेंबर महिन्यात मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने घेतला होता. या ठरावाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री आमित शहा आणि अन्य सर्व संबंधितांना पाठविल्या होत्या. त्यासंबंधी ढवळीकर यांना विचारले असता, सदर विमानतळ हा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा प्रकल्प असल्यामुळे त्याला नाव देण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. त्यामुळे केंद्राने निश्चित केलेल्या नावाचा आम्ही स्वीकार करणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.

सध्या मगो पक्ष सरकारपक्षाचा घटक आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय प्रत्येकाला मान्य करावाच लागेल. आम्हीही त्यापेक्षा वेगळे नसल्यामुळे केंद्र सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले.

Related Stories

आगीत खाक झाला तो कचरा नव्हे, कंपोस्ट खत!

Patil_p

काणकोणात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत

Omkar B

सोनसडय़ावरील ओला कचरा शेडची संरक्षकभिंत कोसळली

Omkar B

मोजक्याच खात्यांचे मर्यादीत कामकाज सुरू

Omkar B

कळंगूट येथील व्यक्तीच्या खून प्रकरणी तरुणास अटक

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी महाशिवरात्री उत्साहात

Amit Kulkarni