Tarun Bharat

भोपाळच्या जामा मशिदीत शिवमंदिर असल्याचा दावा

संस्कृती बचाव मंच न्यायालयात जाणार

भोपाळ / वृत्तसंस्था

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर भोपाळच्या चौक बाजार येथील जामा मशिदीचेही सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. भोपाळच्या या मशिदीत शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी संस्कृती बचाओ मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी भोपाळचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना निवेदन दिले आहे. तसेच याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

भोपाळच्या आठव्या शासक कुदसिया बेगम यांनी त्यांच्या हयात-ए-कूदीस या आत्मचरित्रात भोपाळच्या जामा मशिदीतील शिवमंदिर पाडून मशीद बांधल्याचा उल्लेख केल्याचे चंद्रशेखर तिवारी यांचे मत आहे. या मशिदीचे बांधकाम 1832 मध्ये सुरू झाले आणि 1857 मध्ये पूर्ण झाले. येथे मोठे शिवमंदिर होते, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे यासंबंधी लिखित स्वरुपात पुरावे असून यासंबंधीचे दस्तावेज न्यायालयासमोर सादर करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सर्वच शाळांमध्ये एनसीसीचे प्रशिक्षण?

Patil_p

रविवारी सर्वपक्षीय बैठक; PM मोदीही राहणार उपस्थित

datta jadhav

वकीलांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर ‘छपाक’ बंद

prashant_c

बडगाममध्ये वैद्यकीय पथकावर हल्ला

Patil_p

आम आदमी पक्ष उत्तर प्रदेशात विभानसभा निवडणूक लढणार

Patil_p

कोरोनाचे संकट कायम

Patil_p