इम्युनिटी वाढण्यास होते मदत
धकाधकीच्या जीवनात दैनंदिन छोटय़ामोठय़ा गोष्टींचा तणाव घेणे चांगले असते. यामुळे मेंदू युवा राहतो आणि वृद्धावस्था अधिक चांगल्याप्रकारे घालविण्यास मदत मिळते असे एका संशोधनातून समोर आले आहे.
यापूर्वी 1990 च्या दशकात अशाप्रकारचा तणाव प्रकृतीसाठी हानिकारक मानला जात होता, परंतु पहिल्यांदाच फिरदौस डाभर नावाच्या एका अमेरिकन मनोचिकित्सकाने न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठाच्या एका संशोधकासोबत यासंबंधी अध्ययन पेले आहे.


छोटय़ा-छोटय़ा तणावांचा आमच्या इम्यून सिस्टीमवर सकारात्मक प्रभाव पडत राहतो. आधुनिक जगासाठी छोटे-छोटे तणाव अत्यंत आवश्यक आहेत. उदाहरणर्था एखाद्या ऍथलिटला आगामी शर्यतीवरून काहीसा तणाव असणे आवश्यक आहे, यामुळे हृदय आणि स्नायूंना मजबुती मिळते आणि कामगिरीत सुधारणा होते. हलक्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे रक्तात इंटरल्यूकिन नावाचे रसायन तयार होते, हे रसायन इम्युन सिस्टीमला सक्रीय करते आणि हे संक्रमणाशी लढण्यास मदत करत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
मेंदूचा आकार 40 वर्षांनी एका दशकात सुमारे 5 टक्क्यांच्या दराने घटतो. वयाच्या 70 वर्षांनी घसरणीचा दर वाढत जातो. मेंदूचे हे आंकुचन अशा वृद्ध वयक्ती 4 वर्षांपर्यंत कमी होते, जे नियमित व्यायाम करतात.