Tarun Bharat

साप्ताहिक बाजार परिसर साफ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची

नगरसेवक धीरज गावकर यांनी व्यक्त केलेले मत : जबाबदारी झटकून टाकणे योग्य नव्हे

प्रतिनिधी /काणकोण

काणकोण पालिकेच्या चावडीवर भरणाऱया आठवडा बाजाराला येणाऱया विक्रेत्यांकडून पालिका ज्या अर्थी सोपो कराच्या रूपाने रक्कम गोळा करते तेव्हा बाजार परिसर साफ करण्याची जबाबदारी देखील पालिकेचीच आहे. विक्री संपल्यानंतर विक्रेते टाकावू माल त्याच ठिकाणी टाकून जातात असे सांगून बाजार परिसर साफ करण्याची जबाबदारी झटकून टाकणे संयुक्तिक नाही, असे मत नगरसेवक धीरज गावकर यांनी व्यक्त केले आहे.

या आठवडा बाजाराला हुबळी, बेळगाव तसेच स्थानिक मिळून 300 च्या आसपास विक्रेते येत असतात. या बाजाराचा लाभ जसा काणकोणच्या विविध भागांतील लोकांना होतो त्याचप्रमाणे महसुलाचा विचार केल्यास काणकोण पालिकेच्या खजिन्यात आठवडय़ाला किमान 20 ते 25 हजार रु. जमा होतात. अशा वेळी बाजार परिसर साफ ठेवण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे याचा विसर पडता कामा नये, असे मत गावकर यांनी व्यक्त केले आहे.

मागच्या आठवडय़ात काही विपेत्यांनी टाकावू माल चक्क ध्वजस्तंभाजवळ टाकला आणि पावसाचे निमित्त पुढे करून पालिकेच्या सफाई कामगारांनी ध्वजस्तंभाजवळ टाकलेला कचरा हटविला नाही. त्याचे खूप वाईट परिणाम झाले. आज समाजमाध्यमे प्रभावी झालेली असून नागरिक जागरूक झालेला आहे. अशा वेळी चुकांचे खापर एकमेकांवर फोडण्यापेक्षा आपण किती तत्पर आहोत याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

ज्या ठिकाणी आठवडय़ाचा बाजार भरतो ती जागा सुरक्षित आहे की नाही याचा विचार होत नाही. या ठिकाणचे उघडे गटार, उघडय़ा खड्डय़ात पावसाचे पाणी साचून रोगांना आमंत्रण मिळू शकते. पावसाळय़ात या परिसरात दुर्गंधी पसरलेली जाणवते. याच ठिकाणी पालिकेचे मासळी मार्केट आहे. मासळी मार्केटची सफाई करण्याकडील दुर्लक्षामुळे मासेविपेत्या महिला उघडय़ावर बसून माशांची विक्री करतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी न खेळता ज्या ठिकाणी आठवडय़ाचा बाजार भरतो ती जागा सुरक्षित ठेवावी अशी मागणी आपण दरवेळच्या पालिका बैठकीत करत आलेलो आहे, असे नगरसेवक गावकर यांनी सांगितले.

Related Stories

काँग्रेस पक्षाने वचनबद्धतेवर ठाम राहावे

Amit Kulkarni

पॅकेजच्या आधारे गोव्याला आत्मनिर्भर बनविणार

Omkar B

पेडणे पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांकडून 25 लाखांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या , तिघांना केली अटक

Omkar B

सांखळी परिसरात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात

Amit Kulkarni

ग्राम पंचायतीसाठी 10 ऑगस्टला मतदान

Omkar B

श्रीवनदेवी मुकोबा देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा आजपासून

Amit Kulkarni