शिवसेना (ठाकरे गट)चे नेते संजय राऊत (Samjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनावरील (Saamna) ‘रोकठोक’ (Rokthok) या साप्ताहिक स्तंभात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) याच्यावर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले कि, भाजपकडे (BJP) स्वत:चे हिरो नाहीत आणि त्यामुळेच त्यांना दुसऱ्याचे मुख्यता काँग्रेसचे आयकॉन चोरवे लागते.
आपल्या सदरात लिहिताना ते म्हणाले, “काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत की, स्वातंत्र्य चळवळीत भाजपचा एक कुत्राही मेला नाही. या टिप्पणीने भाजप नेते भडकले आहेत. पण खर्गेजी म्हणाले ते खरे आहे. नाराज होण्यात काय अर्थ आहे? यावर भाजपकडे काही उत्तर आहे का?” असे विचारून खा. संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “एकीकडे मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. तर दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना नविन इंडियाचे जनक म्हटले आहे…अमृता फडणवीस या व्यक्ती आहेत आणि त्यांचे मत व्यक्त करण्यास स्वतंत्र आहेत. पण भाजप त्यांच्या मताला दुजोरा देते का हा प्रश्न आहे.” असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. “नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून प्रत्येकाने त्यांचा आदर केला पाहिजे. पण महात्मा गांधींना लोकांनी राष्ट्रपिता म्हटले आहे. नवा भारत किंवा जुना भारत नाही आणि त्यामुळे नवीन भारताचे कोणीही जनक नाहीत,” असे ते म्हणाले. असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

