Tarun Bharat

शनिवारीही पावसाने झोडपले

Advertisements

जोरदार वाऱयासह पावसाच्या आगमनाने उडाली तारांबळ

प्रतिनिधी/ बेळगाव

शुक्रवारी झालेल्या दमदार पावसानंतर शनिवारी दुपारीही पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. काही पिकांना हा पाऊस पोषक ठरत आहे तर काहींना मारक ठरू लागला आहे. पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी साचून होते. पावसाने शहरातील फेरीवाले, भाजीविपेते आणि इतर व्यापाऱयांची तारांबळ उडविली.

शनिवार तसेच नवरात्र असल्यामुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. मात्र, दुपारी पावसाचे आगमन झाल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनाही वाहने रस्त्यावरच पार्किंग करून आडोसा शोधावा लागला. रेनकोट तसेच छत्र्या सोबत नसल्यामुळे अनेकांना ताटकळत थांबावे लागले.

शनिवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये अधिक वाढ झाली होती. पाऊस पडेल अशी शक्मयता वर्तविण्यात येत होती. ग्रामीण भागातही पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही पिकांना फायदा झाला तर बासमती तसेच अधिक उंच वाढलेल्या भातपिकांना मात्र फटका बसला आहे. यामुळे शेतकऱयांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Related Stories

बाप्पा पावले अन् पुराचे विघ्न टळले!

Amit Kulkarni

ईस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा

Amit Kulkarni

नळाला थेट विद्युतपंप लावल्याने पाणीटंचाई

Amit Kulkarni

बैलूर भागात सुगी हंगाम जोरात

Patil_p

पार्थनहळ्ळी खून प्रकरणाचा दोन दिवसांत छडा

Amit Kulkarni

कोरे, जेड गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni
error: Content is protected !!