Tarun Bharat

Ratnagir : जिल्ह्यात तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार

हवामान विभागाचा अंदाज, बंगालच्या सागरात वादळसदृश स्थिती, शेतकरी चिंताग्रस्त

मौजेदापोली- वार्ताहर

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱयांसह पाऊस असाच तीन दिवस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असल्याचे दापोली येथील डाŸ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. मंगळवारी दापोलीसह इतर तालुक्यांमध्ये विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह पाऊस कोसळत होता.

बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण झाले आहे. तसेच केरळमध्येदेखील वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रामध्ये केरळ किनारपट्टी ते महाराष्ट्र किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती झाली आहे. यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये 19 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि 30-40 कि. मी. प्रतीतास वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामध्येही 19 ऑक्टोबर रोजी यलो अर्लट असून तुरळक भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वेगवान वाऱयासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक्षक हवामान केंद्राने वर्तवली असल्याचे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. दापोलीत मंगळवारी पहाटे 4 वाजल्यापासून गडगडाट सुरू झाला, तर दुपारी 12.30 वाजता जोरदार पावसाने वाऱयासह हजेरी लावली. या जोरदार व वादळी पावसामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

Related Stories

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

Archana Banage

कोल्हापुरात दर्जेदार रस्त्यासाठी एक हजार कोटींची गरज

Archana Banage

सात वर्षांपूर्वीच्या मंजूर योजना अद्याप प्रलंबित का ?

Archana Banage

कोल्हापूर : औरवाडमधील 12 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

Archana Banage

शिरोळ मधील महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण शहर शंभर टक्के लॉकडाउन

Archana Banage

पॅकेजची घोषणा न करता भरपाईची तरतूद करा : समरजितसिंह घाटगे

Archana Banage