वृत्तसंस्था / स्टुटगार्ट (जर्मनी)
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या स्टुटगार्ट खुल्या पुरूषांच्या 250 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ब्रिटनच्या माजी टॉप सीडेड अँडी मरेचा पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात बेरेटिनीने अँडी मरेचा 6-4, 5-7, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. ग्रासकोर्टवरील स्पर्धेत बेरेटिनीने आतापर्यंत 28 सामने जिंकले असून सहा सामने गमविले आहेत. या स्पर्धेतील पुरूष एकेरीचा अंतिम सामना दोन तास, 35 मिनिटे चालला होता. बेरेटिनी आणि मरे यांच्यात आतापर्यंत तीनवेळा सामने झाले असून त्यामध्ये बेरेटिनीने दोन सामने तर मरेने एक सामना जिंकला आहे. 2019 साली झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत बेरेटिनीने विजेतेपद पटकाविले होते तसेच त्याने गेल्यावर्षी क्विन्स क्लब ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती.