Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; ६ जवान शहीद

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी परिसरातील नदीत कोसळली आहे. या बसमध्ये एकूण ३९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे जवान होते. या दुर्घटनेत ६ जवान शहीद झाले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडीमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने ती नदी कोसळली. यावेळी बसमध्ये सुरक्षा दलाचे ३९ कर्मचारी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन) होते.

अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून हे सगळे जवान पहलगामच्या दिशेने येत होते. एका बसमध्ये ३७ जवान प्रवास करत होते. त्यांच्यासोबत २ रहिवासी देखील होते. पहलगाममध्ये बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ही बस नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक जवान जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे.

Related Stories

“ठाकरे सरकारच्या माध्यमातून हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू”

Abhijeet Shinde

”…तर तालिबान्यांना सडेतोड उत्तर देऊ” – जो बायडेन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

datta jadhav

‘हाफकिन’बद्द्ल बोललेलो वक्तव्य दाखवा राजीनामा देतो; तानाजी सावंतांच चॅलेंज

Archana Banage

इराणने बदलले चलनाचे नाव; नवे चलन असेल ‘हे’

datta jadhav

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मंजुरी

Patil_p
error: Content is protected !!