Tarun Bharat

आयटीसीकडून ‘ब्लूपिन’मधील 10 टक्के हिस्सेदारी खरेदी

नवी दिल्ली 

 दैनंदिन वापरातील साहित्य बनविणारी कंपनी आयटीसीने डायरेक्ट टू कस्टमर(डी2सी)ब्रॅण्ड मायलोचे सादरीकरण करणारी कंपनी ब्लूपिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 10.07 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी केली असल्याची माहिती आहे. कंपनीने 39.34 कोटी रुपयामध्ये हे अधिग्रहण करण्यात येणार असल्याची घोषणा एप्रिलमध्ये केली होती. आयटीसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 28 मे 2022 रोजी कंपनीने ब्लूपिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या 10.07 टक्के समभागांचे अधिग्रहण केले आहे. कंपनीने म्हटले आहे, की या गुंतवणुकीसोबत डी2सी क्षेत्रात कंपनी येत्या काळात विस्तार करण्यावर भर देणार आहे. ब्लूपिन टेक्नॉलॉजी मायलो ब्रॅण्डसह आई व लहान मुलांच्या देखभालीसाठी लागणारे उत्पादन व सेवा देत आहे.

Related Stories

लखीमपूर प्रकरणी आशीष मिश्रावर अभियोग चालणार

Patil_p

मुलांनी लावले आई-वडिलांचे लग्न!

Patil_p

विस्तारवादी धोरण ही मानसिक विकृती

Patil_p

गणेशभक्त मुस्लीम महिलेविरोधात फतवा

Patil_p

रस्त्यांना देणार कारसेवकांचे नाव

Amit Kulkarni

जम्मू – काश्मिर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

Tousif Mujawar