मुंबई
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचा समभाग सोमवारी शेअरबाजारामध्ये उच्चांकी स्तर गाठताना दिसला. सोमवारी इंट्राडे दरम्यान शेअरबाजारात कंपनीचा समभाग 2 टक्के इतका वाढत 388 रुपयांवर पोहोचला होता. तंबाखूसह हॉटेलपर्यंतच्या विविध व्यवसायामध्ये कंपनी कार्यरत असून वर्षाच्या आधारावर तिसऱया तिमाहीत व्यवसायामध्ये 23 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा डिसेंबरच्या तिमाहीमध्ये 5007 कोटी रुपये इतका राहिला आहे. आठवडय़ामध्ये समभाग 13 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले आहे.